‘हिंगोलीत कुणाच्या मागे ताकद हे यात्रेनंतर कळेल’; शिवसेना नेत्याची थेट ठाकरे यांच्यावर टीका
हिंगोलीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांची 27 ला सभा होणार आहे. मात्र त्याच्याआधी शिंदे गटाचे नेते तथा आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्यावर निशाना साधला आहे
हिंगोली : 27 ऑगस्ट 2023 | शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे हिंगोलीच्या मैदानावर उतरले आहेत. त्यांची येथील रामलीला मैदानावर सभा होत आहे. तर ते या सभेतून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि कळमनुरी मतदार संघाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर त्यांच्या यासभेचा टीझर देखील लाँच झाला आहे.
तर त्यावरून आता शिंदे गटाचे नेते आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. तर ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बांगर यांनी 28 ऑगस्ट रोजी हिंगोलीत कावड यात्रेचं आयोजन केलं आहे. ज्यात कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत. तर या यात्रेला लाखो लोक हे कावड घेऊन सहभागी होतील असं त्यांनी म्हटलं आहे.
तर यावेळी बांगर यांनी 27 ला ठाकरे यांची येथे सभा होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी येथे कावड यात्रे होईल. त्यावेळी त्यांना कळेल की कुणाच्या मागे किती ताकद आहे. त्याचवेळी दूध का दूध आणि पाणी का पाणी हे देखील 28 ला होईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार

शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...

युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..

'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
