VIDEO | दिघे यांच्या मृत्यू की घातपात? शिवसेना नेत्याची चौकशीची मागणी; केदार दिघे यांचा पलटवार
ज्या आनंद दिघे साहेबांना एका दिवसात डिस्चार्ज मिळणार होता आणि त्या दिवशी काय घडलं, ज्याच्यामुळे आनंद दिघेंचा मृत्यू झाला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिघेंच्या मृत्यूची चौकशी केली पाहिजे.
मुंबई : दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा अनेकांना संशय आहे. यामुळे त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिरसाट यांनी आनंद दिघेंच्या मृत्यूची चौकशी करताना, ज्या आनंद दिघे साहेबांना एका दिवसात डिस्चार्ज मिळणार होता आणि त्या दिवशी काय घडलं, ज्याच्यामुळे आनंद दिघेंचा मृत्यू झाला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिघेंच्या मृत्यूची चौकशी केली पाहिजे. आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत अनेकांच्या मनात शंका. अनेकांचे मत आहे की, त्यांचा अपघात नसून त्यांचा खून झालेला आहे. यावरून या वक्तव्यावरून केदार दिघे यांनी शिंदे गटालाच आता प्रतिसवाल उपस्थित केला आहे. तसेच 22 वर्षे का शांत बसला काही असेल तर द्या. मी खंबीरपणे उभा राहायला तयार आहे. पण बोलायचं म्हणून बोलायचं आणि त्याच्या नावानं टिआरपी मिळवायचा असा केविलवाना प्रकार शिरसाट यांच्याकडून सुरू असल्याचा टोला लगावला आहे.