‘कुछ cm घरसे बाहर नहीं निकले’; उद्धव ठाकरे यांच्यावर कोणाची खरमरीत टीका
राज्यभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फिरत असून ते लोकांना भेटत आहेत. याच कार्यक्रमातून काल पिंपरी येते त्यांनी आम्ही घरात बसून आदेश देत नाही. बाहेर फिरतो, जनतेत मिसळतो, असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. तर आम्ही लोकांच्या दारी जात आहोत, आम्ही घरात बसून आदेश देत नाही अशी टीकाही त्यांनी केली होती.
मुंबई : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभांचे वाटप, दाखले देण्यात येत आहेत. या कार्यक्रमातून राज्यभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फिरत असून ते लोकांना भेटत आहेत. याच कार्यक्रमातून काल पिंपरी येते त्यांनी आम्ही घरात बसून आदेश देत नाही. बाहेर फिरतो, जनतेत मिसळतो, असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. तर आम्ही लोकांच्या दारी जात आहोत, आम्ही घरात बसून आदेश देत नाही अशी टीकाही त्यांनी केली होती. त्यानंतर अशीच टीका शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे. त्यांनी, अगोदर शासन आपल्या घरी होतं आता शासन आपल्या दारीं आहे. तर गेल्या अडीच वर्षात काहीच कारभार झाला नाही. पण आता अनेकांची कामं होतं आहेत. हे सरकार लोकांना हवं तसं काम करतं आहे. आधीच्या सरकारणं दुर्लक्ष केल्यामुळे ह्या अडचणी सोडवल्या गेल्या नसतील. मात्र ह्या समस्या आता शिंदे यांना सांगू. नक्कीच त्या मार्गी लागतील. मुख्यमंत्री शिंदे काम करतायेत सर्व कामांची पाहणी करताहेत. मात्र कुछ cm घरसे बाहर नयी निकले असा टोला त्यांनी लगावला आहे.