सत्यजित तांबे अपक्ष आमदार तरी त्यांचा फोटो झळकला 'या' पक्षाच्या बॅनरवर

सत्यजित तांबे अपक्ष आमदार तरी त्यांचा फोटो झळकला ‘या’ पक्षाच्या बॅनरवर

| Updated on: Feb 17, 2023 | 1:33 PM

अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे भाजप की मूळ पक्ष काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा रंगली होती. पण, नाशिकमध्ये ठिकठिकाणी लागलेल्या बॅनर्समुळे

नाशिक : पदवीधर निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेले उमेदवार सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला. सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीवरून काँगेसमध्ये दोन उभे गट पडले. अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे भाजप की मूळ पक्ष काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा रंगली होती. पण, नाशिकमध्ये ठिकठिकाणी लागलेल्या बॅनर्समुळे एक नवीन चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने शिवजयंती निमित्त शहरात अनेक ठिकाणी बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे यांच्यासोबत आमदार सत्यजित तांबे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे ही नव्या राजकारणाची नांदी आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

Published on: Feb 17, 2023 12:38 PM