जिंदाल ग्रुपच्या जेएसडब्ल्यू कंपनीवरून ठाकरे गट-शिंदे गट आमने सामने; माजी उद्योग मंत्री देसाई यांच्या नेतृत्वात मोर्चा
माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. तर रायगड मधील स्थानिकांच्या रोजगारावरून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी रायगड मधील ठाकरे गटाचे इतर प्रमुख पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी होते.
रायगड, 12 ऑगस्ट 2023 | रायगड जिल्ह्यातील वडखळला का येथे असलेल्या जिंदाल ग्रुपच्या जेएसडब्ल्यू कंपनीवर ठाकरे गटाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. तर रायगड मधील स्थानिकांच्या रोजगारावरून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी रायगड मधील ठाकरे गटाचे इतर प्रमुख पदाधिकारी देखील या मोर्चात सहभागी होते. याचदरम्यान शिंदे गट देखील ठाकरे गटाविरोधात येथे आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर ठाकरे गट- शिंदे गट येथे एकमेकांच्या समोर आल्याने वारावरण तंग झाले होते. यावेळी मोठा पोलिस फौज फाटा हा दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करत होता. यावेळी ठाकरे गटाकडून जीएसडब्ल्यू कंपनीवर काढण्यात आलेल्या या मोर्चाचा स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हान दिलं तर स्थानिक आमदार महेंद्र दळवी आणि उत्तर रायगडचे शिवसेना जिल्हाध्यक्ष राजा केणी यांचा या आंदोलनाला विरोध केला. तर सत्तेत असताना ठाकरे गटाने जिंदाल कंपनीबरोबर व्यवहार सांभाळले आणि सत्ता गेल्यानंतर यांना रोजगाराची आठवण आली का? असा खडा सवाल उत्तर रायगडचे शिवसेना जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी उपस्थित केला आहे.