राऊत सकाळी भोंग्यासारखे वाजत असतात, शिवसेना नेत्याची सडकून टीका
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करत, राज्यात मुका घ्या मुका हा सिनेमा सुरू असल्याचे म्हटलं होतं. त्यावर आता शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी टीका केली आहे
नवी दिल्ली : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करत, राज्यात मुका घ्या मुका हा सिनेमा सुरू असल्याचे म्हटलं होतं. त्यावर आता शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी टीका केली आहे. संजय राऊत हे दररोज सकाळी भोंग्यासारखे कसे वाजत असतात? त्यांच्याकडे लोक करमणूक म्हणून ते पाहत असतात. तो व्हीडिओ मॉर्फ केला आहे. एखाद्या सभ्य आणि घरंदाज स्त्रीवर राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. ज्यामुळे उद्या महिला राजकारणात यावं की नको हा विचार करतील. तर राऊत यांना मुकाबदल विशेष प्रेम आहे त्यांनी असंच मागच्या काळामध्ये देखील केलं होतं. ज्यामुळे त्यांना जाहिर माफी मागावी लागली होती.