शिवसेना उपनेते यशवंत जाधव रुग्णालयात; सैफी रुग्णालयात उपचार सुरू
तर यशवंत जाधव हे आमदार यामिनी जाधव यांचे पती असून त्यांनी माजी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मुंबई महापालिकेत भूमिका बजावली आहे.
मुंबई : शिंदे गट शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्याबाबत बातमी येत असून त्यांनी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. यशवंत जाधव यांना छातीत दुखत असल्यानं रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर येथील सैफी रुग्णालयात सुरु उपचार आहेत. तर यशवंत जाधव हे आमदार यामिनी जाधव यांचे पती असून त्यांनी माजी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मुंबई महापालिकेत भूमिका बजावली आहे. तर जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाने कारवाई करत त्यांची कसून चौकशी करण्यात आली होती. तर त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही त्याकारवाई विरोधात कोणतीच विचारपूस झाली नव्हती. तर शिवसेनेकडूनही कोणतीच विचारपूस करण्यात आली नव्हती. त्यावरून आमदार यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव दोघेही नाराज होते. याच नाराजीतून त्यांनी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला होता.