जहरी टीका करणाऱ्या अनिल बोंडे यांचा आज सूर बदलला; म्हणाले, ‘भाजप शिवसेनेमध्ये’
मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्यासाठी या जाहीरातीत देवेंद्र फडणवीसांना स्थानच दिले नाही, अशी चर्चा आहे. याचदरम्यान बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, अशा शब्दांत भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
अमरावती : शिंदेच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्यासाठी या जाहीरातीत देवेंद्र फडणवीसांना स्थानच दिले नाही, अशी चर्चा आहे. याचदरम्यान बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, अशा शब्दांत भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यावरून आता भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता असतानाच आता पुन्हा एकदा अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र यावेळी त्यांचे सुर बदलले दिसले. त्यांनी, कालच्या वादानंतर सामंजस्यची भूमिका घेत भाजप शिवसेनेमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याला सुरुवात झाल्याचं म्हटलं आहे. तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे फक्त एकच ध्येय आहे. ते म्हणजे 2024 ची निवडणूक आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवणे.