‘आमदारकी गेली तरी चालेल पण…’, शिंदेच्या शिवसेनेतील आमदाराच्या वक्तव्याची चर्चा
वैजापूर विधासभा मतदासंघांचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी वैजापूर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये विरोधकांवर टीका करताना रामगिरी महाराजांबद्दल वक्तव्य केले आहे. तर आमदारकी गेली तरी चालेल पण...
आमदारकी गेली तरी चालेल पण रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही, असं वक्तव्य शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी केलं आहे. तर साधूंना ठेचून मारण्यासारखा प्रसंग वैजापुरात होतो की काय? असा सवाल करत आमदार रमेश बोरनारे यांनी शंका व्यक्त केली आहे. ‘परवा धर्मवीर २ चित्रपट पाहिला. धर्मवीर २ चित्रपटाची सुरूवात झाली आणि पालघरमध्ये साडे चार पाच वर्षापूर्वी ज्या दोन साधूंनी भगवं वस्त्र परिधान केलं होतं. त्या साधूंची दगडाने ठेचून त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. तर धर्मवीर २ चं टायटल मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तसं वैजापूरला ही धर्मवीर २ होतो की काय? हे समजून घेण्याची आपल्याला गरज आहे’, असे रमेश बोरनारे यांनी म्हटले तर आमदारकी गेली तरी चालेल रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मी रामगिरी महाराजांचा सच्चा भक्त आहे, त्यांच्यासाठी माझी आमदारकी गेली तरी चालेल असं वक्तव्य आमदरा रमेश बोरनारे यांनी केलं. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघात रामगिरी महाराजांचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.