गद्दार नाही म्हणणाऱ्या संजय राऊत यांचेही शुद्धीकरण करा, कुणी केली ही मागणी?

गद्दार नाही म्हणणाऱ्या संजय राऊत यांचेही शुद्धीकरण करा, कुणी केली ही मागणी?

| Updated on: Jan 22, 2023 | 9:58 AM

आम्ही जिथे जातो तेथे ते गोमूत्र शिंपडतात. मग, बाळासाहेबांचे विचार सोडून जे काँग्रेससोबत जाऊन आले त्यांचेही शुद्धीकरण केले पाहिजे.

मुंबई : आम्ही सकाळी ११, १२ वाजता कार्यक्रम करणारे लोक नाही. जनतेची कामे करणारे, सेवा करणारे लोक आहोत. आमचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो.आमच्याबाबत जे काही घडले आणि मुख्यमंत्री पदासाठी कुणी काय केले त्याचा भांडाफोड लवकरच करणार आहे. ते ऐकून अनेक शिवसैनिक आमच्यासोबत येतील. शिवसेनाप्रमुख यांनी मला एक दिवस पंतप्रधान करा मी ३७० कलम हटवतो असे सांगितले होते. ३७० कलम हटविण्यास ज्यांचा विरोध होता त्याच काँग्रेससोबत ते फिरत आहेत. आम्ही जिथे जातो तेथे ते गोमूत्र शिंपडतात. मग, बाळासाहेबांचे विचार सोडून जे काँग्रेससोबत जाऊन आले त्यांचेही शुद्धीकरण केले पाहिजे, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

Published on: Jan 22, 2023 09:58 AM