16 आमदार अपात्र प्रकरणावरून शिंदे गट राष्ट्रवादीत जुंपली; शिरसाट यांचा झिरवळ यांच्यावर पलटवार

16 आमदार अपात्र प्रकरणावरून शिंदे गट राष्ट्रवादीत जुंपली; शिरसाट यांचा झिरवळ यांच्यावर पलटवार

| Updated on: Jul 11, 2023 | 7:33 AM

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटात कमालिची अस्वस्थता पहायला मिळत आहे. यावेळी झिरवळ यांनी सर्व बाजूनं विचार केल्यास शिवसेनेचे 16 आमदार अपात्र होणार असं म्हटलं होतं.

मुंबई : रायगडमधील रोहा येथे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटात कमालिची अस्वस्थता पहायला मिळत आहे. यावेळी झिरवळ यांनी सर्व बाजूनं विचार केल्यास शिवसेनेचे 16 आमदार अपात्र होणार असं म्हटलं होतं. तर आपण त्यावर काही बोलणार नाही. त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्ष आणि विधीमंडळाचे आहेत असेही त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी झिरवळ यांना टोला लगावताना, आमच्या पैकी कुणीही अपात्र होणार नाही. त्यामुळे झिरवळांनी सांभाळून बोललं पाहिजे असा सल्ला दिला आहे.

Published on: Jul 11, 2023 07:32 AM