राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर शिंदे गटाच्या महिला नेत्याचा पलटवार; म्हणाल्या, ‘...गद्दारी कोणी’

राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर शिंदे गटाच्या महिला नेत्याचा पलटवार; म्हणाल्या, ‘…गद्दारी कोणी’

| Updated on: Jun 19, 2023 | 1:51 PM

याचदरम्यान संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवताना, त्यांनी गद्दार दिन साजरा करावा अशी टीका केली होती. त्याला आता शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.

मुंबई : ठाकरे गटासह शिंदे गटाकडून शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात येणार आहे. याची जय्यत तयारी दोन्ही कडून केली जात आहे. याचदरम्यान संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवताना, त्यांनी गद्दार दिन साजरा करावा अशी टीका केली होती. त्याला आता शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार करताना, गद्दार दिवस जर साजरा कोणाला करायचा असेल तर तो उबाठा गटाने करावा. कारण तुम्ही जनतेशी गद्दारी केलीत. तुम्ही फक्त सत्तेसाठी जाऊन सोनियांच्या दारी बसलात. त्याच्यामुळे जर गद्दार कोणी केली असेल तर ते तुम्हा असा घणाघात केला आहे. त्याचबरबरोबर ठाकरे गटाने कॉमेडी सर्कस दिन साजरा करावा. त्यांच्याकडे विदूषक खूप झालेले आहेत. तर लोक का जात आहेत याच्यावर विचारविनिमय न करता फक्त दुसऱ्यावर टीका आणि टीका करण्यापलिकडं आता यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही. तर त्यांच्या कृतीतून जो वैचारिक गोंधळ दिसू लागलाय असाही टोला त्यांनी लगावला आहे.

Published on: Jun 19, 2023 01:51 PM