Shinde Group: कोर्टाने विचारले होते तुम्ही कोण आहात? आज शिंदे गट सादर करणार दोन दुरुस्ती याचिका

| Updated on: Aug 04, 2022 | 10:59 AM

आज शिंदे गटाकडून दोन दुरुस्ती याचिका दाखल करण्यात येणार आहेत. 16 आमदारांच्या निलंबनावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. या 16 आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव असल्याने न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

शिवसेनेने दाखल केलेल्या 16 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवर काल सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान शिंदे गटाने दुसरा पक्ष स्थपन केलेला नाही तसेच दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीनही झालेले नाही मग तुम्ही आहेत कोण? असा प्रश्न कोर्टाने हरीश साळवे यांच्यामार्फत शिंदे गटाला विचारला होता. यावर आमचा पक्ष शिवसेनाच असून आम्ही एकाच पक्षातील दुसरा गट असल्याचा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला होता, त्यानंतर कोर्टाने शिंदे गटाला दुरस्ती याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले होते. आज शिंदे गटाकडून दोन दुरुस्ती याचिका दाखल करण्यात येणार आहेत. 16 आमदारांच्या निलंबनावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. या 16 आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव असल्याने न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

Published on: Aug 04, 2022 10:59 AM