Shivsena : ठाकरे गटाच्या आमदारांना भिडणार शिंदे गटाचे ‘हे’ उमेदवार, काय म्हणाले उदय सामंत?
शिवसेनेमध्ये फुट पडून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे सोपवले. तर, 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार आहे. त्याची सुनावणी सुरु झाली. मात्र, त्याधीच शिंदे गटाने मोठी खेळी खेळली आहे.
रत्नागिरी : 14 सप्टेंबर 2023 | आगामी विधानसभा निवडणुकीला अवकाश असला तरी आतापासूनच या निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष यांच्या कोर्टात लागणार आहे. मात्र, उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अडचणीत आणण्याची खेळी शिंदे गटाने खेळी आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिली. उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना रोजरोज काय उत्तरं देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर जे आक्षेप घेतात त्यावर काय बोलणार? असे ते म्हणालेत. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने जी मुदत मागितली ती त्यांनी दिली आहे. आरक्षण टिकलं पाहिजे अशा पद्धतीने कार्यवाही सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडले असतील तर त्याची डागडुजी करण्याच्या सूचना देण्यात येतील. तर प्रकाश आंबेडकर यांनी जो आरोप केला त्यावर बोलताना फक्त मंदिरच नव्हे तर चर्च, मशिदी याही सुरक्षित राहिली पाहिजेत. पण, निवडणुका आल्यावर हे विषय पुढे येतात असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे गटांचे जे आमदार आहेत त्यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचे ते आमचे ठरले आहे. जिथे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत त्या ठिकाणी आमचे उमेदवार निश्चित झाले आहेत असे मोठे विधान मंत्री उदय सामंत यांनी केले.