शिंदे गट 'शिवसेना भवन' ताब्यात घेणार असल्याची चर्चा; शिंदे गटाने याबाबत घेतला मोठा निर्णय

शिंदे गट ‘शिवसेना भवन’ ताब्यात घेणार असल्याची चर्चा; शिंदे गटाने याबाबत घेतला मोठा निर्णय

| Updated on: Jul 19, 2022 | 6:17 PM

शिंदे गट 'शिवसेना भवन' ताब्यात घेणार असल्याची चर्चा रंगली होती. यावर शिंदे गटाने खुलासा केला आहे. शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिलेली आहे.

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवसनेचे तब्बल 12 खासदार(Shivsena MP) शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यातच शिंदे गट ‘शिवसेना भवन’ ताब्यात घेणार असल्याची चर्चा रंगली होती. यावर शिंदे गटाने खुलासा केला आहे. शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करणार नाही अशी माहिती सुत्रांनी दिलेली आहे. शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये हा निर्णय झाला असल्याचे बोलले जात आहे.

Published on: Jul 19, 2022 06:14 PM