शिंदे गटाचे मंत्री म्हणाले ‘या’ भाजप नेत्यांना राज्यसभेवर पाठवणार?
संजय राऊत म्हणतात समन्वय हवा. ते त्यांना कदाचित राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले असेल. बाळासाहेबांच्या विचारांवर ते ठाम राहिले असते तर ही वेळ आली नसती असा टोला मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला आहे.
नवी दिल्ली : भाजप नेत्या पंकजा मुंडे ( PANKAJ MUNDE ) या ठाकरे गटात प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरु आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे ( CHANDRAKANT KAHIRE ) यांनीही उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKAREY ) आणि पंकजा मुंडे यांची चर्चा झाली आहे असे सांगितले आहे.
पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर अजूनही आपली प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यावर भाजप, काँग्रेसने प्रतिक्रिया दिल्यानंतर आता शिंदे गटाकडूनही एक प्रतिक्रिया समोर आली आहे.
शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटामध्ये जाऊन पंकजा मुंडे नेमके काय करणार? पंकजा यांना राज्यसभेवर ते पाठवू शकत नाहीत. तेवढी संख्या त्यांच्याकडे नाही असे ते म्हणाले आहेत.
Published on: Jan 14, 2023 12:35 PM
Latest Videos