Special Report | शिवसेनेच्या बालेकिल्यात शिंदे गटाचा गुलाल?
शिवसेनेसाठी सर्वात मोठा झटका म्हणजे शिंदे गटानं शिवसेनेच्या बालेकिल्ला अर्थात औरंगाबाद जिल्ह्यात मोठं यश मिळवलंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खासकरुन बंडखोर ४० आमदारांच्या मतदारसंघात भरघोस निधी दिल्याचा दावा केला जातोय. अनेक स्थानिक पदाधिकारी सुद्धा शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे किमान काही भागातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तर शिंदे गटानं स्वतःचं वर्चस्व सिद्द केलंय.
मुंबई : शिवसेनेतली(shivsena) फूट आणि सत्ताबदलानंतरच्या पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीत(Gram Panchayat elections) भाजपचा डंका राहिलाय. राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी राहिलीय. शिंदे गटानं मुसंडी मारलीय. तर शिवसेना 271 ग्रामपंचायत निवडणुकांमध्येचौथ्या स्थानावर गेलीय. 271 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपनं सर्वाधिक म्हणजे 82 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या राष्ट्रवादीनं 53 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवलाय. तिसऱ्या स्थानावर शिंदे गटानं 40 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. चौथ्या स्थानावर राहिलेल्या शिवसेनेला 27 ग्रामपंचायतींची सत्ता मिळालीय. तर त्यानंतर काँग्रेसला 22 ग्रामपंचायती जिंकता आल्या आहेत. शिवसेनेसाठी सर्वात मोठा झटका म्हणजे शिंदे गटानं शिवसेनेच्या बालेकिल्ला अर्थात औरंगाबाद जिल्ह्यात मोठं यश मिळवलंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खासकरुन बंडखोर ४० आमदारांच्या मतदारसंघात भरघोस निधी दिल्याचा दावा केला जातोय. अनेक स्थानिक पदाधिकारी सुद्धा शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे किमान काही भागातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तर शिंदे गटानं स्वतःचं वर्चस्व सिद्द केलंय. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक मुद्दे आणि पक्षाऐवजी उमेदवार बघून मतदान होत असलं तरी शिंदे गटाचा विजय शिवसेनेसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरु शकतो.