‘शिवसेनाप्रमुखांचे विचार मान्य नाहीत तेच असं बोलणार, लाळघोटेपणा...’; ठाकरे यांच्यावर शिवसेना नेत्याची टीका

‘शिवसेनाप्रमुखांचे विचार मान्य नाहीत तेच असं बोलणार, लाळघोटेपणा…’; ठाकरे यांच्यावर शिवसेना नेत्याची टीका

| Updated on: Jun 19, 2023 | 8:12 AM

त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. परवा जागतिक गद्दार दिन आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे.

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पुर्व संधेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लंडनहून येताच शिंदे गटासह भाजपवर निशाना साधला. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. परवा जागतिक गद्दार दिन आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन होण्याआधी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा मुंबईत घेण्यात आला. त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी ही टीका केली आहे. त्या टीकेला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी टोला लगावला आहे. त्यांनी, शिवसेनेचा वर्धापन दिन हा त्यांच्यासाठी गद्दार दिन असेल. तो आमच्यासाठी उठाव दिन आहे. तर शिवसेनाप्रमुखांना कायम शंड पेक्षा बंड करणारा, पेटलेला शिवसैनिक आवडायचा. उठाव करणारा शिवसैनिक आवडायचा. तसं आम्ही केलं. पण हेच त्यांचे विचार मानत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या तोंडून असे वक्तव्य येत आहे. त्यामुळे आमच्या वर्धापन दिनात याचा त्यांना करारा जवाब मिलेगा असा इशारा शिरसाट यांनी दिला आहे.

Published on: Jun 19, 2023 08:12 AM