Special Report | अमरावतीचा लोकसभेचा गुंता सुटता सुटेना आता तिढा ही वाढला; शिंदे यांच्या नेत्यानेही केला दावा

Special Report | अमरावतीचा लोकसभेचा गुंता सुटता सुटेना आता तिढा ही वाढला; शिंदे यांच्या नेत्यानेही केला दावा

| Updated on: Jun 11, 2023 | 10:13 AM

कल्याण लोकसभा मतदार संघावरून भाजप-शिंदे गटात वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता भाजप शिंदे गटात जागावाटपावरून आणि लोकसभेच्या जागेवरील दाव्यावरून मिठाचा खडा पडला आहे. असतानाच आता शिंदे यांच्या शिवसेनेमुळं अमरावतीत देखील तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी पक्ष मजबुतीच्या दृष्टीने प्रयत्न सुरुवात केले आहेत. याचदरम्यान कल्याण लोकसभा मतदार संघावरून भाजप-शिंदे गटात वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता भाजप शिंदे गटात जागावाटपावरून आणि लोकसभेच्या जागेवरील दाव्यावरून मिठाचा खडा पडला आहे. असतानाच आता शिंदे यांच्या शिवसेनेमुळं अमरावतीत देखील तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा दावा केला आहे. तर याच जागेवरून विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी आपला दावा सांगितला आहे. तर बच्चू कडू यांनी देखील शड्डू ठोकला आहे. त्यामुळे आधीच शिंदे गटासह भाजपची डोकेदुखी वाढली होती. याचदरम्यान शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी देखील दावा केला आहे. तर त्यांनी अमरावती लोकसभेचा खासदार शिवसेनेचाच होणार असं म्हटलं आहे. त्यामुळे अमरावतीत युतीत गुंता वाढत चाललल्याचे दिसत आहे. त्यावरच हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 11, 2023 10:13 AM