Special Report | ठाकरे गटाला 24 तासात दोघांचा राम राम; एकासाठी प्रयत्न, दुसऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
वर्षभरात 50 आमदार 13 खासदार यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आपला भरोसा दाखवला आहे. तर शिंदे-फडणवीस सरकार आणि शिंदे गटाच्या बंडाला आता एक वर्षही पूर्ण होणार आहे. याचदरम्यान आता शिवसेनेचा वर्धापन दिन ही आज होणार आहे. मात्र याच्या 24 आधीच पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यावेळी दोन नेत्यांना राम राम केला आहे.
मुंबई : राज्यात गेल्या वर्षभरात शिवसेनेची चांगलीच वाताहात झाली आहे. वर्षभरात 50 आमदार 13 खासदार यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आपला भरोसा दाखवला आहे. तर शिंदे-फडणवीस सरकार आणि शिंदे गटाच्या बंडाला आता एक वर्षही पूर्ण होणार आहे. याचदरम्यान आता शिवसेनेचा वर्धापन दिन ही आज होणार आहे. मात्र याच्या 24 आधीच पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यावेळी दोन नेत्यांना राम राम केला आहे. तर शिंदे गटात एका नेत्यानं प्रवेश केला आहे. शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. यावरून ठाकरे गटात खळबळ उडाली असतानाच शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या मनीषा कायंदे यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. तसेच मनीषा कायंदेंनी शिंदेंच धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे सध्या कोय सुरू आहे ठाकरे गटात असेच प्रश्न सामान्यांसह नेत्यानांही पडला आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट