“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे झपाटलेला शिवसैनिक”, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच शिशिर शिंदे यांची प्रतिक्रिया
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकामागे एक धक्के बसत आहेत. अनेक निष्ठावंत नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिशिर शिंदे यांनी देखील पक्षातून बाहेर पडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. शिशिर शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मुंबई: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकामागे एक धक्के बसत आहेत. अनेक निष्ठावंत नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिशिर शिंदे यांनी देखील पक्षातून बाहेर पडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. शिशिर शिंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशानंतर शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. “मी चळवळीतला कार्यकर्ता आहे रस्त्यावरती उतरून काम करणारा माणूस आहे. गेल्या काही वर्षांपासून मला काम दिलं नव्हतं, म्हणून मी मातोश्रीला जाऊन राजीनामा दिला. जे घडलं ते घडलं मी आता उद्याकडे बघतोय आजपासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. एकनाथ शिंदे हे झपाटलेला मुख्यमंत्री आहेत, झपाट्याने काम करत आहे. सामानांच्या भल्यांचा विचार करणारा मुख्यमंत्री शिवसैनिक आहे. झपाटलेला शिवसैनिक हाच मुख्य आत्मा शिवसेनेचा आहे,” असं शिशिर शिंदे म्हणाले.