उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के! आता ‘या’ नेत्यालाही शिंदेंच्या शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न सुरु
शिवसेनेचा वर्धापन दिन उद्या सोमवारी आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसले आहेत. ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज आमदार मनिषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन उद्या सोमवारी आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसले आहेत. ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज आमदार मनिषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी शिशिर शिंदे यांनी राजीनामा दिला असला तरी ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान शिशिर शिंदे यांना शिंदेंच्या शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न केलं जात आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या निकटवर्तीयांकडून शिशिर शिंदेंना संपर्क केला जातोय.
Published on: Jun 18, 2023 03:14 PM
Latest Videos