Shiv Sainik – सदा सरवणकरांवर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करा
गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. याबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे दादर पोलीस स्टेशन येथे दाखल झाले आहेत. पोलीस स्टेशनच्या बाहेर शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे.
मुंबई- आमदार सदा सरवणकर (Sada sarvankar) यांनी गोळीबार केल्याच्या आरोपांनंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेकडून (Shivasene)करण्यात आली आहे. यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत व अंबादास दानवे यांनी गुन्हा दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. याबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे(Anbadas Danve) दादर पोलीस स्टेशन येथे दाखल झाले आहेत. पोलीस स्टेशनच्या बाहेर शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे.
Latest Videos