Ambadas Danve on Raut | शिवसैनिक घाबरत नसतो, जे सरेंडर झाले, त्यांनी गद्दारी केली अंबादास दानवे यांचा पुन्हा हल्ला
Ambadas Danve on Raut | भाजप ईडीचा वापर स्वस्तःच्या घराची संस्था म्हणून करत आहे. ईडीच्या माध्यमातून अनेक राज्यात विरोधकांचा आवाज दाबण्यात येत असल्याचा आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे.
Ambadas Danve on Raut | भाजप (BJP) ईडीचा (ED) वापर स्वस्तःच्या घराची संस्था म्हणून करत आहे. ईडीच्या माध्यमातून अनेक राज्यात विरोधकांचा (Opposition Party) आवाज दाबण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (MLA Ambadas Danve) यांनी केला आहे.शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर अगोदरपासूनच भाजपचा रोष होता. महाविकास आघाडी स्थापन्यात त्यांनी महत्वाची भूमिका राबवली होती. त्याचाच राग केंद्रातील भाजपच्या मनात होता. त्यामुळे यापूर्वी त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली. आता त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली आहे. आपण हाच प्रकार झारखंडमध्ये पाहतो आहोत. पश्चिम बंगालमध्येही हाच प्रकार सुरु आहे. जे जे भारतीय जनता पक्षाला विरोध करत आहे. त्यांच्यावर अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. शिवसैनिक कधीच घाबरत नाही. तो सरेंडर करत नाही. ज्यांनी सरेंडर केले आहे, त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केला.