ठाकरे गट तर पुढे आलाच मुख्यमंत्र्यांनीही दिला शब्द; रोख रक्कम पाठवत केली आर्थिक मदत, केली विचारपूस
त्यांना आता उपचारांसाठी आर्थिक चणचण भासत असतल्याने त्यांनी शिवसैनिकाला मदत करा, अशी विनंती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी केली होती. त्याप्रमाणे ठाकरे गटाने घरी जात त्यांची चौकशी करत त्यांना मदतीचा हात पुढे केला.
सोलापूर : एसटी कामगार सेनेचा विभागीय सचिव अरुण कामतकर मणक्याच्या समस्येमुळे दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना आता उपचारांसाठी आर्थिक चणचण भासत असतल्याने त्यांनी शिवसैनिकाला मदत करा, अशी विनंती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी केली होती. त्याप्रमाणे ठाकरे गटाने घरी जात त्यांची चौकशी करत त्यांना मदतीचा हात पुढे केला. त्याचबरोबर शिंदे यांनी देखील त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कामतकर यांच्या घरी पाठवत चौकशी केली. व्हिडिओ कॉलवर संवाद साधत त्यांनी कोणतीही काळजी करू नका आम्ही सर्व मदत करू, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. तर शिवसैनिक अरुण कामतकर यांना मुख्यमंत्र्यांनी रोख 1 लाखाची मदत दिली आहे. हे सर्व फक्त ‘TV9 मराठी’च्या बातमीमुळं झालं. तर ‘TV9 मराठी’ दाखवलेल्या बातमीची दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी दखल घेतली.