नाशिक मधील शिवसैनिक मुंबईकडे रवाना , संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची तयारी

नाशिक मधील शिवसैनिक मुंबईकडे रवाना , संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची तयारी

| Updated on: Feb 15, 2022 | 11:58 AM

शिवसेनेची (shivsena) आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सूचक इशारा दिला आहे.

मुंबई: शिवसेनेची (shivsena) आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सूचक इशारा दिला आहे. आज पत्रकार परिषद होणार आहे. मी स्वत:च जाहीर केलं आहे. त्यामुळे तुम्ही थोडी वाट पाहा. आमचीही पत्रकार परिषद पाहा. या, ऐका. कधी तरी शिवसेनेचं ऐका. सौ सोनार की एक लोहार की आज करणार आहोत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. मात्र, दुपारी पत्रकार परिषदेत काय गौप्यस्फोट करणार यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Published on: Feb 15, 2022 11:58 AM