Special Report | नारा मनसेचा, पुकारा राणांचा,हल्ला सोमय्यांवर
किरीट सोमैया हे रात्री उशिरा राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी खार पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी सोमैया यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात सोमैयांच्या गाडीची काच फुटली असून सोमैया यांच्या हुनवटीला छोटी जखम झाली.
मुंबई : मनसेने मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टीमेटम दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यानंतर राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान केले होते. मात्र शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राणा दाम्पत्याने माघार घेतली. यानंतर राणा दाम्पत्याला काल खार पोलिसांकडून अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमैया हे रात्री उशिरा राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी खार पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी सोमैया यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात सोमैयांच्या गाडीची काच फुटली असून सोमैया यांच्या हुनवटीला छोटी जखम झाली. याआधी शुक्रवारी मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यानंतर किरीट सोमैया यांनाही शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागले.
Latest Videos