महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच

महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच

| Updated on: Mar 28, 2024 | 4:41 PM

भाजपाने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील पक्षाची ताकद पाहाता ही जागा भाजपाला सुटावी अशी सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांनी इच्छा आहे. या मतदार संघात पक्षाने दोन वर्षे बुथ लेव्हलला इतके काम केले आहे की भाजपाचा सहज विजय होईल असे भाजपा शहराध्यक्ष शिरीष बोरळकर यांनी म्हटले आहे.

संभाजीनगर : महाआघाडीचा घटक पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गटाने संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. मात्र महायुतीने अद्यापही संभाजीनगरातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. ही जागा शिवसेनेकडे होती. शिवसेनेतून चंद्रकांत खैरे गेल्या निवडणूकीत पडले होते. आता शिवसेनेत फूट झाल्यानंतर या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेने दावा केला आहे. याबाबत भाजपाचे शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी ही जागा भाजपाला मिळावी अशी मागणी केली आहे. दोन वर्षे अथक परिश्रम करुन आम्ही बुथची मांडणी केली आहे. केंद्र आणि राज्याच्या योजना लोकांपर्यंत पोहचविल्या आहेत. दोन आमदार एक खासदार आहे. एक केंद्रीय मंत्री तर एक राज्यातील कॅबिनेटमध्ये मंत्री आहे. भाजपाकडे महानगर पालिकेचे 24 नगरसेवक आहेत. 14 ते 16 जिल्हा परिषद आमच्या ताब्यात आहे. 585 ग्रामपंचायती पैकी 367 ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आहे. तीन पंचायत समिती आमच्या ताब्यात आहेत. त्यामुळे एवढी सगळी पक्ष संघटना मजबूत असताना आमचा येथे सहज विजय होऊ शकतो अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यामुळे आम्ही आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावणकुळे यांना ही जागा भाजपाला सुटावी अशी मागणी केली आहे.

Published on: Mar 28, 2024 04:38 PM