उद्धव ठाकरे हे एकटे सभा घेऊच शकत नाहीत; शिंदेच्या मंत्र्याची खरमरीत टीका
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याच्याआधी मविआची सभा ही सगळी कॉमेडी सभा असेल अशी टीका केली होती तर या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार असतील असा, इशारा त्यांनी दिला होता.
छ. संभाजीनगर : येथे महाविकास आघाडीची भव्य सभा होणार असून 1 लाख लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान या सभेवरून आता आरोप-प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याच्याआधी मविआची सभा ही सगळी कॉमेडी सभा असेल अशी टीका केली होती. तर या सभेमुळे परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार असतील असा, इशारा शिरसाट यांनी दिला होता. त्यानंतर आता शिंदे गटाच्या मंत्र्यानेच उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. छ. संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे विकासाचे मुद्देच नाहित त्यामुले त्यांना सतत टीका करावी लागत आहे असं म्हटलं आहे. तर ते एकटे सभा घेऊ शकत नाही म्हणून त्यांना महाविकास आघाडीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. टीका करणे हाच विषय उरला आहे, असेही भुमरे यांनी म्हटलं आहे.