Aaditya Thackeray | 'मी आज गद्दारांचा मुखवटा फाडायला आलोय'-tv9

Aaditya Thackeray | ‘मी आज गद्दारांचा मुखवटा फाडायला आलोय’-tv9

| Updated on: Aug 20, 2022 | 1:44 PM

आदित्य ठाकरे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मी आज गद्दारांचा मुखवटा फाडायला आलोय अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता म्हटलं आहे.

शिवसेनेचे आमदार आणि खासदार फोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले. त्यानंतर शिवसेनेतील अनेक नेते आणि पदाधिकारी हे उगवत्या सुर्याला नमस्कार याप्रमाणे शिंदे गटात जात आहेत. हे होणारे डॅमेज थांबवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा सुरू केली आहे. त्यातंर्गत आदित्य ठाकरे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मी आज गद्दारांचा मुखवटा फाडायला आलोय अशी टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता म्हटलं आहे. तसेच त्यांनी जे शिंदे गटात गेलेत त्यांच्यावरही निशाना साधताना गद्दार हे गद्दार असतात अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.