Aurangabad | औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात-tv9

Aurangabad | औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात-tv9

| Updated on: Aug 20, 2022 | 10:08 AM

नरेंद्र त्रिवेदी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नरेंद्र त्रिवेदी हे गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. आता तेच शिंदे गटात गेल्याने औरंगाबादमध्ये शिवसेना हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राज्यातील सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला खाली खेचल्यानंतर मुख्यमंत्री होत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्के देण्याचे सुरूच ठेवले आहे. दरम्यान काल दहीहंडीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांनी अजून अनेकर धक्के बसतील असे म्हटलं होतं. यानंतर आता शिवसेनेला औरंगाबाद जिल्ह्यात आणखीन एक धक्का बसला आहे. औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी हे शिंदे गटात गेलेले आहेत. नरेंद्र त्रिवेदी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. नरेंद्र त्रिवेदी हे गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. आता तेच शिंदे गटात गेल्याने औरंगाबादमध्ये शिवसेना हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.