Special Report | Kirit Somaiya यांची जखम खरी की टोमॅटो सॉस?

| Updated on: Apr 26, 2022 | 9:20 PM

एखादा माथेफिरु वेडा, स्वतःवर हल्ला झाला, म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लागू करा, असं सांगत असेल, तर त्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय.

मुंबई : खार पोलिस ठाण्यात राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी गेलेल्या भाजप नेते किरीट सोमैया यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात सोमैया यांच्या हनुवाटीला छोटीशी जखम झाली होती. यावरुन शिवसेनेकडून सोमैया यांना खोचक टोले लगावण्यात आले आहेत. एखादा माथेफिरु वेडा, स्वतःवर हल्ला झाला, म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लागू करा, असं सांगत असेल, तर त्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. काल हनुवटीला लागलं होतं. आज हनुवटी गुळगुळीत आहे, असा चिमटा काढतानाच किरीट सोमय्याने राणा दाम्पत्याचं पालकत्व घेतले का? असा सवाल शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे.