Kishori Pednekar | शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, किशोरी पेडणेकर यांनी ठणकावले

Kishori Pednekar | शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, किशोरी पेडणेकर यांनी ठणकावले

| Updated on: Sep 03, 2022 | 6:03 PM

Kishori Pednekar | शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असे किशोरी पेडणेकर यांनी ठणकावून सांगितले.

Kishori Pednekar | शिवसेनेचा(Shivsena) दसरा मेळावा (Dasara Melava) शिवाजी पार्कवरच होणार असे किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी ठणकावून सांगितले. शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेते. या मेळाव्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. दसऱ्या मेळाव्याची परंपरा फार जूनी आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली होती. या दिवशी शिवसेनेची स्थापना करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे हे अनेक व्यक्तींचा समाचार घेत असत. त्यांचा दसरा मेळावा कायम गाजला. राज्यात 20 जूननंतर राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेतून 40 आमदार फुटले आणि भाजससोबत घरोबा करत त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. या घडामोडीनंतर आता शिवाजी पार्कवर कोणी सभा घ्ययाची यावरुन वादंग पेटले आहे. शिवसेना आणि शिंदे सेना या दोघांनीही शिवाजी पार्क सभा घेण्यासाठी पालिकेकडे अर्ज सादर केले आहेत.

Published on: Sep 03, 2022 06:03 PM