Saamna | 'कोणते मोदी खरे? सामनातून भाजपला थेट सवाल-tv9

Saamna | ‘कोणते मोदी खरे? सामनातून भाजपला थेट सवाल-tv9

| Updated on: Aug 21, 2022 | 10:09 AM

भ्रष्टाचार संपवतो अशी गर्जना करणारे मोदी खरे, की कालपर्यंत ज्यांच्यावर ‘ईडी’ कारवाईची भीती असणाऱ्या खासदार भावनाताईंकडून राखी बांधून त्यांची रक्षा करणारे मोदी खरे? असा सवाल करण्यात आला आहे.

शिवसेनेमध्ये उभी फूट पाडत एकनाथ शिंदे यांनी बंडाखोरी केली. तसेच त्यांनी राज्यात भाजपला सोबत घेत सत्ता स्थापन केली. यादरम्यान त्यांना शिवसेनेच्या आमदारांसह 12 खासदार ही जाऊन मिळाले. यात खासदार भावना गवळी देखील आहेत. ज्यांना ईडीची नोटीस गेली होती. तर आता उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेत काही आमदारांसह 3 एक खासदार राहिले आहेत. दरम्यान आता शिवसेना मुखपत्र सामानातून भावना गवळी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्याकडून लोकांना आजही अपेक्षा आहेत, पण संभ्रम असा की, कोणते मोदी खरे? असे म्हटलं आहे. भ्रष्टाचार संपवतो अशी गर्जना करणारे मोदी खरे, की कालपर्यंत ज्यांच्यावर ‘ईडी’ कारवाईची भीती असणाऱ्या खासदार भावनाताईंकडून राखी बांधून त्यांची रक्षा करणारे मोदी खरे? असा सवाल करण्यात आला आहे.

Published on: Aug 21, 2022 10:09 AM