शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी, पहा स्पेशल रिपोर्ट

शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी, पहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Mar 28, 2024 | 9:14 PM

महायुतील घटक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची लोकसभा उमेदवाराची पहिली यादी आली आहे. यात आठ जणांची नावे असून त्यात सात विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट दिले आहे. तर ठाणे आणि कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदार संघाची नावे जाहीर केलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी बाहेर आली आहे. या यादीत आठ उमेदवारांची नावे असून त्यात सात विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली आहे. या यादीत कल्याण-डोंबिवली, ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आता कल्याणमधून उभे राहणार की ठाण्यातून याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाणा येथून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेक येथून राजू पारवे, हातकणंगले येथून धैर्यशील माने यांना तिकीट दिले आहे. दक्षिण- मध्य मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या राहुल शेवाळे यांच्याशी उद्धव ठाकरे यांच्या अनिल देसाई यांची थेट लढत होणार आहे. तर शिर्डीतून शिंदेचे सदाशिव लोखंडे यांची ठाकरेंच्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या लढत होणार आहे. बुलढाण्यात ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर यांचा शिंदेंच्या प्रतापराव जाधवांशी सामना होणार आहे. हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांची शिंदेंच्या हेमंत पाटील यांच्या लढत होईल. मावळमध्ये ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांचा सामना शिंदेंच्या श्रीरंग बारणेंशी होणार आहे.

Published on: Mar 28, 2024 09:13 PM