म्हणजे राऊतांनी मान्य केलं, शहाजीबापू नक्की काय मान्य केलं म्हणत आहेत

म्हणजे राऊतांनी मान्य केलं, शहाजीबापू नक्की काय मान्य केलं म्हणत आहेत

| Updated on: Mar 23, 2023 | 8:01 AM

उद्धव ठाकरे गटाचे राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. त्याला शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे

लातूर : शिवसेनेत फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 40 आमदार गेले आणि शिंदे गट तयार झाला. त्यावेळेपासून शिंदे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून सतत टीका होत असते. आताही उद्धव ठाकरे गटाचे राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. त्याला शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांनी शिवसेनेची गुढी आपण पुन्हा उभारू असे म्हंटले होते, त्यावर शहाजीबापू पाटील यांनी, राऊत यांनी मान्य तरी केलंय की सगळी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेली. त्यामुळेच ते गुढी उभारण्याची भाषा करत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिंदे हे फक्त खुर्च्यांचे मुख्यमंत्री असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यावर आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्याला कोणताही आधार नाही. एकनाथ शिंदे हे फक्त मंत्री असतानाही लोकप्रिय होते. आज ते मुख्यमंत्री आहेत. ते सर्वसामान्य जनतेचा प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी रात्रंदिवस्तीत कष्ट करतायेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभी राहताना दिसत आहे