50 आमदार ठाकरेंना कंटाळले होते; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूबच्या कबरीवर शिवशोभीकरणाचं काम केलं जात होतं. मुस्लिम धर्माचा पुरस्कार ठाकरे करत होते.
मुंबई : शिवसेना फुटली. त्यात एकनाथ शिंदे यांची एक आणि उद्धव ठाकरे यांचा उद्धव ठाकरे गट तयार झाला आहे. शिंदे यांच्या गटात 40 च्या वर आमदार गेल्याने त्यांना निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदे यांना मिळाली. शिंवसेनेत बंड केल्यापासून ते सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले तरी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाकडून 50 खोके आणि गद्दार असा उल्लेख शिंदे गटात गेलेल्या आमदारांचा होतो. यावरच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर लाड यांनी ते 50 आमदार ठाकरे यांच्या हिंदुविरोधी भूमिकेला कंटाळले होते अशी टीका केली आहे.
मविआच्या सरकारमध्ये असो किंवा दिल्लीत काँग्रेसकडून सातत्याने सावरकरांचा अपमान होत होता. तर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूबच्या कबरीवर शिवशोभीकरणाचं काम केलं जात होतं. मुस्लिम धर्माचा पुरस्कार ठाकरे करत होते. यालाच हे 50 आमदार आणि कितीतरी नेते हे कंटाळलेले होते. तर ज्या हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादीची हाक दिली त्यांच्या या आमदारांना हे कदापी मान्य नव्हतं. राज्य हे एका प्रकारे खड्ड्यात जाण्याच्या प्रयत्नात होतं आणि त्याला साथ देत होते उद्धव ठाकरे. त्यामुळे त्यांच्या विरोधात बंड करून या 50 आमदारांनी पुन्हा नवीन सरकार स्थापन केल्याचं ते म्हणाले.