महाराष्ट्र अस्वस्थ ठेवण्याचं काम केलं; शिवसेना नेत्याचे संजय राऊत यांना खडे बोलं

महाराष्ट्र अस्वस्थ ठेवण्याचं काम केलं; शिवसेना नेत्याचे संजय राऊत यांना खडे बोलं

| Updated on: Apr 23, 2023 | 12:28 PM

यावरूनच शिवसेना नेते पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी राऊत हे पत्रकार आहेत. त्यांना काय बोललं की टिव्हीवाले दाखवतात हे माहित आहे. त्यामुळे ते सकाळी एक शब्द सोडतात आणि महाराष्ट्र अस्वस्थ होतो

पाचोरा : शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या जळगावमधील पाचोऱ्यात ठाकरे गटाची सभा होत आहे. याची जय्यत तयारी देखील झाली आहे. मात्र त्याच्याआधीच जळगावसह राज्याचं राजकारण तापलेलं आहे. संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं नाही तर सभेत घुसणार असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर सभेत घुसून दाखवा आणि परत जाऊन दाखवा असं चॅलेंज राऊत यांनी दिलं आहे. तर उंदीर सभेत घुसला तर तो परत जाणार नाही असा इशाराही दिलेला आहे. त्यानंतर यावर प्रतिक्रीया येत आहेत. यावरूनच शिवसेना नेते पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी राऊत हे पत्रकार आहेत. त्यांना काय बोललं की टिव्हीवाले दाखवतात हे माहित आहे. त्यामुळे ते सकाळी एक शब्द सोडतात आणि महाराष्ट्र अस्वस्थ होतो. त्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचं काम हे संजय राऊत यांनी केलं आहे. काहीतरी बेताल वक्तव्य करून महाराष्ट्र अस्वस्थ ठेवण्यापेक्षा उद्धव ठाकरेंचा पक्ष पुन्हा कसा उभारण्याची काळजी घ्या असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Published on: Apr 23, 2023 12:28 PM