Kishori Pednekar | याकूबच्या कबरीशी शिवसेनेचा काही संबंध नाही, किशोरी पेडणेकर यांचा पलटवार
Kishori Pednekar | याकूबच्या कबरीशी शिवसेनेचा काही संबंध नाही, किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे.
Kishori Pednekar | याकूब मेमनच्या (Yakub Memon) शिवसेनेचा काडीमात्र संबंध नसल्याचे शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी स्पष्ट केले आहे. हा तिथल्या ट्रस्टचा निर्णय आहे. ती ट्रस्ट खासगी आहे. कब्रस्तानची जागाही या ट्रस्टची असल्याची बाजू त्यांनी मांडली.आशिष शेलार बावचाळले आहेत. ते काहीही टीका करत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला. आशिष शेलार (Aashish Shelar) यांना 2017 मध्ये ही मुंबईची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांना अपयश आले. आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या प्रसिद्धीत तसूभरही कमी आली नाही. त्यामुळे आता हा मुद्दा उकरून काढल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे सांगत शिवसेनेचा याप्रकरणाशी काडीमात्र संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.