Sadabhu khot: तिकीट नाकारून शिवसेनेने छत्रपतींच्या वंशजांचा अपमान केला- सदाभाऊ खोत

Sadabhu khot: तिकीट नाकारून शिवसेनेने छत्रपतींच्या वंशजांचा अपमान केला- सदाभाऊ खोत

| Updated on: May 29, 2022 | 5:41 PM

विरोधी पक्ष भाजपनेही छत्रपतींच्या वंशजाना दिलेले शब्द पाळण्यात आला नसल्याचे म्हटले आहे.मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला,असं म्हणत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली होती

चिंचवड – साताऱ्याची गादी व कोल्हापूरची गादी या दोघांचीही आम्ही सन्मान आदर करतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजांचा अपमान शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष चालवणाऱ्या शिवसेनेने (Shivsena)केला. याच दुःख महाराष्ट्राला आहे.अशी टीका रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhu khot ) यांनी केला आहे.राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात सद्या घमासान सुरु आहे. शिवसेने छत्रपती संभाजी यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्यावर विविध संघटनांनी टीकेची झोड उठवली आहे. विरोधी पक्ष भाजपनेही (BJP) छत्रपतींच्या वंशजाना दिलेले शब्द पाळण्यात आला नसल्याचे म्हटले आहे.मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला,असं म्हणत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली होती.

Published on: May 29, 2022 05:41 PM