शिवसेना फक्त एकच... दसरा मेळाव्या आधीच उद्धव ठाकरेंची डरकाळी

शिवसेना फक्त एकच… दसरा मेळाव्या आधीच उद्धव ठाकरेंची डरकाळी

| Updated on: Sep 30, 2022 | 2:43 PM

आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार हे त्यांना सांगाव लागत हेच त्यांचं दुर्दैव आहे. असं उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरु केली आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावले आहेत. दसरा मेळाव्यासाठीचा पहिला टीझर शिंदे गटाकडून जारी करण्यात आला आहे. पंचमी यात्रेच्या मुहूर्तावर सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दसरा मेळाव्यावर प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले असे अनेक मेळावे होत असतात. पंकजाताई सुद्धा मेळावा घेत आहेत.त्याच्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा एकच, शिवतीर्थावर, शिवसेना ही एकच आहे. शिंदे गटाकडून व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टरवर देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे. आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार हे त्यांना सांगाव लागत हेच त्यांचं दुर्दैव आहे. असं उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Published on: Sep 30, 2022 01:50 PM