दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानवे
भाजपा देशात आणि समाजा-समाजात भांडणं लावण्याचे काम करीत आहे आणि या राजकारणावर आपली राजकारणाची पोळी दिल्लीपासून गल्लीपर्यंत शेकत आहेत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना अजितदादांमध्ये खरी मर्दानगी असेल तर त्यांनी स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवावी असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रीया देताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जितेंद्र आव्हाड काय चुकीचे बोललेले नाहीत. आमच्या एकनाथ शिंदे यांनी देखील हेच केले. स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला पाहीजे होती. शरद पवार यांनी देखील कॉंग्रेसमधून निघाले तेव्हा चरखा चिन्ह घेतले. त्यानंतर त्यांनी घड्याळ चिन्ह घेतले.आता तुतारीवाला माणूस घेतला आहे. हे मर्दानगी लक्षण असते. स्वतंत्र पक्ष स्थापन केला पाहीजे होता अशी प्रतिक्रीया अंबादास दानवे यांनी दिली आहे. लोकांना उपदेश करणे, महाराष्ट्राची ब्ल्यू प्रींट काढण्याची घोषणा करुन काही होत नसते. मनसेच्या भूमिका सतत बदलत आहेत अशीही टीका दानवे यांनी केले आहे.