Anil Parab | कोण कोणाची हंडी फोडणार हे जनताच ठरवेल
मी अजूनपर्यंत 8 आणि 9 थरांची दहीहंडी पहिली आहे. 50 थरांची दहीहंडी मी पहिल्यांदा ऐकत आहे. बहुदा ते स्पेनला गेले असतील, असे म्हणत परब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला आहे.
मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांनी दहीहंडी उत्सव आणि नवनियुक्त सरकारवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आणि दहीहंडीचं अतूट नातं आहे. कुठलेच पक्ष जेव्हा दहीहंडी साजरे करते नव्हते त्यावेळी शिवसेना मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी करत होती. यंदा कोरोनामुक्त दहीहंडी साजरी होत आहे. आम्ही देखील वांद्रे पूर्व विभागत शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने दहीहंडी साजरी करत आहोत. येत्या महापालिकेत भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडू असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबाबत कोणाची हंडी कोण फोडेल हे जनताच ठरवेल. आमची दहीहंडी ही वेगळी असते, त्यांची दहीहंडी कोणती आहे ती माहीत नाही. निवडणुकीत कळेल, असे म्हणाले. तसेच मी अजूनपर्यंत 8 आणि 9 थरांची दहीहंडी पहिली आहे. 50 थरांची दहीहंडी मी पहिल्यांदा ऐकत आहे. बहुदा ते स्पेनला गेले असतील, असे म्हणत परब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला आहे.
Published on: Aug 19, 2022 10:11 PM
Latest Videos