एकनाथ शिंदे अयोध्येतील राम मंदिराला ‘इतक्या’ तोळ्याचं धनुष्यबाण देणार, कुणी केला नवस

| Updated on: Apr 08, 2023 | 6:40 PM

VIDEO | अयोध्येच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिराला देणार धनुष्यबाणाची भेट, बघा कसं असणार?

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाच्या सर्व आमदार, मंत्र्यांसह अयोध्येच्या दिशेला रवाना झाले आहेत. सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबई विमानतळावरुन लखनौच्या दिशेला रवाना होतील. तर राज्यातील सर्व जनतेचे लक्ष लागलेलं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येच्या दौऱ्यावर असताना अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा बाण भेट म्हणून देणार आहेत. हा धनुष्यबाण २ तोळ्याचा असून राम मंदिराला ते भेट देणार आहे. दरम्यान, विदर्भातील शिवसेनेचे नेते किरण पांडव यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर धनुष्यबाण भेट देण्याचा नवस केला होता. हा नवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल झाल्यानंतर त्यांच्या हस्ते फेडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Apr 08, 2023 06:39 PM
तब्बल 17 तास नॉट रिचेबल असलेले अजित पवार म्हणाले…
‘आम्ही पाप धुण्यासाठी जातोय मग तुम्ही कशासाठी गेले होते?’, संजय राऊतांवर हल्लाबोल