माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी दिली -  संजय राऊत

माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी दिली – संजय राऊत

| Updated on: Feb 09, 2022 | 11:20 AM

ईडीकडून निकटवर्तीयांची (ED) होणारी चौकशी आणि भाजप नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (venkaiah naidu) यांना पत्रं लिहलं आहे.

मुंबई : ईडीकडून निकटवर्तीयांची (ED) होणारी चौकशी आणि भाजप नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (venkaiah naidu) यांना पत्रं लिहलं आहे. या पत्रात त्यांनी खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी मदत करण्याचा काही लोकांनी मला गळ घातली होती. मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी ते माझा वापर करणार होते. पण मी त्याला नकार दिला. तेव्हा त्यांनी मला माझी रेल्वे मंत्र्यासारखं तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली. माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी देण्यता आली, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी या पत्रात अनेक दावे केले असून त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Published on: Feb 09, 2022 11:20 AM