जल आक्रोश मोर्चा होता की ईव्हेंट?, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. जल आक्रोश मोर्चा होता की ईव्हेंट होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. भाजपच्या वतीने औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावरून संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. जल आक्रोश मोर्चा होता की ईव्हेंट होता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मोर्चात जे गांभीर्य असतं ते कुठे दिसलं नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
Latest Videos