Video | मोदींची शिवरायांसोबतची तुलना होऊच शकत नाही, उद्धव ठाकरे गरजले

Video | मोदींची शिवरायांसोबतची तुलना होऊच शकत नाही, उद्धव ठाकरे गरजले

| Updated on: Jan 23, 2024 | 3:13 PM

राम मंदिर सोहळ्यात गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना केली. यावरुन सर्वत्र टीका होत आहे. नाशिक येथील पक्षाच्या महाअधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी या तुलनेबद्दल कठोर शब्दात टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर राम मंदिरच उभारले गेले नसते असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

नाशिक | 23 जानेवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाले. त्या सोहळ्यात श्रीराम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केली. यावरुन वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अधिवेशन नाशिक येथे सुरु आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची शिवरायांबरोबर तुलना अजिबात नाही… त्रिवार नाही… होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर राम मंदिर उभेच राहू शकले नसते असेही ठाकरे यावेळी म्हणाले. आज रामाचे मुखवटे घालून राम फिरत आहेत. त्यांचे मुखवटे फाडण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. जो जो महाराष्ट्राच्या मुळावर आला त्याला महाराष्ट्राने मुठमाती दिलेली आहे, हा इतिहास असल्याची आठवण त्यांनी करवून दिली.

Published on: Jan 23, 2024 03:12 PM