Video | ज्यांनी शिवसेना पळविली त्या वालीचा वध करा, उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील महाअधिवेशनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता खरमरीत टीका केली. ज्यांनी कोणी आपली शिवसेना पळविली आणि त्याचा जो कोणी वाली असेल त्याचा राजकीय वध करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
नाशिक | 23 जानेवारी 2024 : नाशिक महाअधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पळविणाऱ्या एकनाथ शिंदे आणि भाजपा यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आज राम मंदिराचं श्रेय घेताय घ्या. पण त्या रामाचा एक तरी गुण तुमच्यात असू द्या. प्रभू राम एकवचनी होते. ज्या शिवसेने तु्म्हाला दिल्लीच्या गादीपर्यंत पोहचविले. त्या शिवसेनेशी दिलेले वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे असा सवाल त्यांनी यावेळी केला. ज्यांनी कोणी आपली शिवसेना पळवली आणि त्याचा जो कोणी वाली असेल त्याचा राजकीय वध करण्याचा निर्धार करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. सगळं वातावरण राममय झालं आहे. कालचा इव्हेंट साजरा झाला. राम की बात हो गई अब काम की बात करीत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी याचं नाव न घेता जोरदार टीका केली.
Published on: Jan 23, 2024 05:11 PM
Latest Videos