Special Report | राष्ट्रवादी नेत्याच्या वक्तव्यावर अजित पवार यांचे स्पष्टीकरण मात्र शिवसेना नेत्यानं डिवचलंच; म्हणाला, ‘हे’ होणारच नाही!
यावर अजित पवार यांनी देखील आपलं मत मांडत भाषणात बोलून मुख्यमंत्री होत नाही तर त्यासाठी 145 चा आकडा लागतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा लागतो. त्यावरून माजी मंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठ विधान केले आहे.
मुंबई : विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं. याचदरम्यान यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. तर यावर अजित पवार यांनी देखील आपलं मत मांडत भाषणात बोलून मुख्यमंत्री होत नाही तर त्यासाठी 145 चा आकडा लागतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा लागतो. त्यावरून माजी मंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठ विधान केले आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीत राहून कधीच मुख्यमंत्री होऊ शकत नसल्याचे विजय शिवतरे यांनी म्हटले आहे. तर अजित पवार हे कर्तबगार नेते आहेत मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले तर ते कधीच मुख्यमंत्री होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा आणि सत्य तर विरोधकांची टीका यावर हा स्पेशल रिपोर्ट