शिवसेना-भाजपची पहिली सहमती, मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी जमीन हस्तांतरणाला मंजुरी

| Updated on: Sep 09, 2021 | 8:41 AM

ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गासाठी जागा देण्यास शिवसेना –भाजपमध्ये सहमती झाली. तीन वेळा तहकूब करण्यात आलेला आणि एक वेळा दफ्तरी दाखल करण्यात आलेला बुलेट ट्रेनसाठीच्या  जागा हस्तांतरणाच्या प्रस्तावाला  सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. 

ठाणे : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन (Bullet train) प्रकल्पाकरिता जमीन हस्तांतरणाचा ठराव शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेतीलच्या महासभेत अवघ्या काही सेकंदात कोणत्याही चर्चेविना मंजूर झाला. बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली. ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गासाठी जागा देण्यास शिवसेना –भाजपमध्ये सहमती झाली. तीन वेळा तहकूब करण्यात आलेला आणि एक वेळा दफ्तरी दाखल करण्यात आलेला बुलेट ट्रेनसाठीच्या  जागा हस्तांतरणाच्या प्रस्तावाला  सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे.  या महत्वाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे.   या प्रस्तावावावरून सुरुवातीला शिवसेनेने विरोध केला असला तरी काल झालेल्या महासभेत मात्र प्रकल्पासाठी जागा हस्तांतरणाबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये सहमती झाल्याचे चित्र सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले.

BMC चा मोठा निर्णय, 127 वर्ष जुने पूल पाडणार, 12 नवे पूल उभारणार
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 9 September 2021